परभणी सिटीलाईन न्यूज नेटवर्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हंबरडा मोर्चानिमित्त नुकतीच परभणी जिल्ह्यातील शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
मोर्चा विराट करण्यासाठी सेना नेते अंबादास दानवे यांनी विविध सूचना करत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेला हा लढा लढावाच लागेल,असे आवाहन श्री.दानवे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी शिवसेना उपनेते तथा खासदार संजय जाधव, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद श्री. आनेराव ,जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, उपजिल्हाप्रमुख सदाशिवराव देशमुख, उपजिल्हाप्रमुख बंडू लांडगे परभणी तालुकाप्रमुख पंढरीनाथ भाऊ घुले, बाळासाहेब राखे,जिंतूर तालुका प्रमुख राम शर्माजी,जिंतूर शहर प्रमुख अरविंद कटारे भाऊ व महिला आघाडी जिल्हा संघटक मंगल आत्या कथले, उप जिल्हासंघटक सुरेखा शेवाळे टाले,जिंतूर तालुकाप्रमुख गीता पुरी,शोभा इक्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते..
