नाशिक दिनकर गायकवाड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिकच्या सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संघटनेच्या वतीने नाशिक येथे आमदार राहल ढिकले, मा. महापौर रंजना भानसी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आदिवासी विकास विभागात प्रामाणिक आणि सचोटीने सेवा
देणाऱ्या सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यात ननाशी शासकीय आश्रमशाळेचे मा.प्राचार्य एस. बी. बधान यांना मान्यवारांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान, यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पी. के. महाले, अध्यक्ष पी. डी. जोपळे आदींनी मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी संघटनेचे सचिव एस.बी.बधान,प्रकाश विधाते,सहारे, गावडे आदी उपस्थित होते.
