नाशिक दिनकर गायकवाड क्रां.व्ही. एन.नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या दिंडोरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात शहीद भगतसिंग व गडकिल्ले: महाराष्ट्राची सांस्कृतिक, ऐतिहासिक ओळख या विषयांवर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
छायाचित्र-अजित अशोक ब्राह्मणे
अध्यक्षस्थानी डॉ. प्रल्हाद दुधाने होते.व्याख्याते म्हणून डॉ. नारायण शिंदे, डॉ. रामदास भोंग, प्रा.शंकर भोईर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. रामदास भोंग, डॉ. नारायण शिंदे, प्रा. शंकर भोईर, डॉ. प्रल्हाद दुधाने यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे उपप्राचार्य डॉ. सुनील उगले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. चंद्रप्रकाश कांबळे, प्रा. वैशाली गांगुर्डे, प्रा. हनुमंत भोये, प्रा. रोहित साळवे, प्रा. आनंदा जोपळे, मोबीन सय्यद, सुनील चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक प्रा. चंद्रप्रकाश कांबळे यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. तुकाराम भवर यांनी केले तर आभार प्रा. वैशाली गांगुर्डे यांनी मानले.
