नाशिक दिनकर गायकवाड पोलीस असल्याचे भासवून दुचाकीने जाणाऱ्या वृद्धाच्या हातातील एक तोळ्याची अंगठी काढून घेत त्यांची फसवणूक केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रामेश्वर महादेव मणेरकर (वय ७०, रा. सिद्धेश्वर गल्ली, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड) हे दुकानदार असून, दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नांदूर लिंक रोडने सुझुकी ॲक्सिस दुचाकीवरून जात होते.
पाटाजवळ आले असता दोन अनोळखी इसमांनी संगनमत करून त्यांना थांबविले व पोलीस असल्याचे भासवून अनोळखी दोन इसमांच्या तिस-या साथीदाराच्या मदतीने फिर्यादींना हाताच्या बोटात असलेली दहा ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करून अंगठी लंपास केली.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तीन तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
