श्रीरामपूर दिपक कदम-येथील विन्सेन्शन मिशन सर्विस सोसायटी संचलित डी पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलने वाघोली येथे नुकत्याच झालेल्या सेकंड ओपन तायक्वांदो चॅम्पियनशीप स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
प्रसंगी विद्यालयातील चि.सार्थक सुहास यादव (इ.सातवी) याने तायक्वांदो स्पर्धेतील क्योरुगी या खेळ प्रकारात उत्तम कामगिरी बजावत सब ज्यूनियरच्या ४३ किलो वजनी गटात यशस्वी होऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सिल्वर मेडल पटकावले व डी पॉल स्टेट बोर्ड स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.दरम्यान त्याला तायक्वांदो प्रशिक्षक विजय योसेफ लोंढे तसेच विद्यालयाचे क्रीडाशिक्षक संदीप निबे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून,संस्थेचे व्यवस्थापक फादर शिजो, प्रशासक फा.फ्रँको,प्राचार्या सिस्टर ब्लेसा,समन्वयक सि. रेन्नी,सचिव मॉली कुथूर,वरिष्ठ लिपीक रविंद्र लोंढे,स्पोर्ट ऍक्टिव्हिटी इन्चार्ज सोनाली झांजरी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.
