संस्कृतभारतीची संगमनेरात नुतन कार्यकारिणी जाहीर

Cityline Media
0
संगमनेर विशाल वाकचौरे संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्कृत भारती या राष्ट्रीय संस्थेची संगमनेर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. नुकत्याच झालेल्या  झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृत भारतीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षा, डॉ. सौ.रुपाली कापरे या उपस्थित होत्या.संस्कृतभारती ही देश पातळीवरील संस्था १९८१ साली दिल्ली येथे स्थापन झाली असून, आज ती भारतासह परदेशातील अनेक देशांमध्ये कार्यरत आहे.

"मनसा सततं स्मरणीयम्, 
वचसा सततं वदनीयम्
लोकहितं मम करणीयम्” या भावनेतून संस्कृतभारतीचे ध्येय प्रत्येक भारतीयाच्या बोलण्यात व संस्कारांत संस्कृत रुजविण्याचे संस्थेचे कार्य मोठे आहे. 'राष्ट्र प्रथम' ही भावना मनात ठेवून सर्व स्वयंसेवक संस्कृतभाषेच्या प्रचार प्रसारचे कार्य करत असतात.

संगमनेर तालुका कार्यकारिणीत नवनियुक्त तालुका संयोजक म्हणून ए. टी. जोशी  यांची निवड झाली तर सहसंयोजिका म्हणून मनिषा मोहोळे व योगिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.कार्यकारणी रचना पुढील प्रमाणे

बालकेंद्र विभाग संयोजक - सुलभा जोशी, शकुंतला खोजे व भारती दळवी.
सुभाषित व संभाषण प्रशिक्षण - विद्या कुलकर्णी, मोहिनी कानवडे,मल्हार सराफ.
गीता प्रशिक्षण विभाग- दाक्षायणी भाटे,पूजा दिक्षित इत्यादी सदस्य विभागश:नियुक्त झाले आहेत.

बैठकी दरम्यान नव्या कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात संस्कृत संभाषण वर्ग, गीता प्रशिक्षण,सुभाषित पाठांतर,संस्कृत नाट्यवर्ग व बालकेंद्र उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यकारिणीची उद्घोषणा, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अहिल्यानगर जिल्हा संयोजक सौरभ म्हाळस यांनी व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!