महानगरपालिकेकडून शहरातील सहाही विभागात अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत नेहमीप्रमाणे नुकतेच मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.नाशिक पूर्व,नाशिक पश्चिम, नाशिकरोड, नविन नाशिक, सातपूर व पंचवटी विभागातली अनधिकृत भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते तसेच निष्कासीत केलेले अतिक्रमण काढून जप्त. केलेल्या टपऱ्या, हातगाडया,बॅनर्स, होर्डिंग,फ्लेक्स,आदी मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त करून ते मनपाच्या गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले.
नाशिक मनपा हद्दीत सहाही विभागात अतिक्रमण विभागाकडून नुकतेच अतिक्रमण निर्मूलन पथकाने
सकाळी १० वाजेपासून कारवाईला सुरुवात केली. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून मनपाचा दैनंदिन पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या सूचनेनुसार व अति.आयुक्त
 स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनानुसार अतिक्रमण उपायुक्त संगिता नांदुरकर, सर्व विभागीय अधिकारी, मनपा अतिक्रमण विभागाचे सर्व पथक प्रमुख या कारवाईमध्ये रस्त्यालगत व वाहतुकीस अडथळा ठरणारे अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर अतिक्रमण निर्मूलन

पथकाने मोहीम राबवून ६८ अनधिकृत भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्यात आले. तसेच ४३ अनधिकृत अतिक्रमणे निष्कासीत करण्यात आली. तसेच होर्डिंग, बॅनर्स, फ्लेक्स असे ४४ ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यात आले.

मनपा कार्यक्षेत्रातील सर्व नागरीकांना या मोहीमेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, अनधिकृत किंवा विनापरवाना अतिक्रमणे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावी.अन्यथा मनपाकडून कडक कारवाई करण्यात येईल, तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही दैनंदीन कारवाई करण्यात येईल,असे आवाहन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!