संगमनेर प्नतिनिधी राज्यात प्रज्ञावंताची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर नगरीतील वास्तववादी साहित्यिक कचरु तथा के.जी.भालेराव त्यांच्या सेवा निवृत्ती सत्कार समारंभाची नियोजन आढावा नुकतीच बैठक येथील हॉटेल पंचवटी येथे उत्पसाहात पडली.
साहित्यिक भालेराव हे सामाजिक उपक्रमात नेहमी सहभागी असतात त्यांनी समाजाशी असलेली नाळ कधीच तुटु दिली नाही एक लोकसंग्रहाक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.आता ते नुकतेच सेवा निवृत्त होत आहे.
यावेळी नियोजन बैठकीच्या अध्यक्ष हिरालाल पगडाल,सत्कारमूर्ती साहित्यिक.के.जी.भालेराव, सूर्यकांत शिंदे ,राजा अवसक,समीर लामखडे,रवींद्र घोसाळे,मच्छिंद्र कानवडे,विकास वावळ, कैलास बडे, तेजस घोसाळे, बाळासाहेब राऊत,अनुराधा आहेर, ज्ञानेश्वर राक्षे,बंटी यादव,विनोद गायकवाड,सचिन साळवे, रवी दिवे,आदी सत्कार समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
