अहिल्यानगर झेंडीगेट परिसरात गोवंश जातीचे कत्तल करणारे आरोपी ५३० गोमांससह जेरबंद

Cityline Media
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 

अहिल्यानगर प्नतिनिधी शहरातील झेंडीगेट परिसरात गोवंश जातीचे जनावराचे कत्तल करणारे आरोपी ५३० किलो गोमांससह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढत कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांचे मार्गदर्शना खालील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षकदिपक मेढे व पोलीस अंमलदार गणेश लोंढे,विष्णु भागवत,विशाल तनपुरे यांचे पथक तयार करुन अहिल्यानगर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

पथकाने नुकतेच अहिल्यानगर शहरामध्ये झेंडीगेट परिसरात जावुन माहिती घेत असतांना पथकास झेडीगेट परिसरात लकी फ्रेश चिकन दुकानामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याचे उद्देशाने जिवंत जनावरे आणलेले असुन ते जनावरांचे कत्तल करणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने  झेडीगेट येथे जावुन खात्री केली असता काही इसम लकी फ्रेश चिकन दुकानामध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल करतांना दिसुन आले. तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी जात असतांना पोलीसांची चाहुल लागताच काही इसम तेथुन पळुन गेले.

काही इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे १) तोहिद नुर कुरेशी वय - १९ वर्षे रा. डावरेगल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर २) सोहिल इकबाल कुरेशी वय- २६ वर्षे रा. सदरबाजार भिंगार, ता. जि. अहिल्यानगर ३) समिर शफिक कुरेशी वय- ३३ वर्षे रा. सदर बाजार, भिंगार ता. जि. अहिल्यानगर ४) रिजवान महम्मदहुसैन कुरेशी वय- ३६ वर्षे रा. सदरबाजार भिंगार, ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले आहे.

इसम नामे तोहिद नुर कुरेशी याचेकडे पळुन गेलेल्या इसमांचे नांव ५) वाशिफ मुन्नावर कुरेशी रा.सुभेदारगल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर ६) कैफ मुन्नावर कुरेशी रा.सुभेदारगल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.

या ठिकाणीवरुन १,५४,०००रुपये किंमतीची ५३० किलो गोमांस, ५०० कि.चे लोखंडी सत्तुर व सुरा असा एकुण १,५९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द पोकॉ विशाल आण्णासाहेब तनपुरे नेम - स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांचे 

फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाणे गु.र.नं. ९८४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१,३२५,३(५) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम क. ५(अ), ५(ब), ५(क),९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कोतवाली पोलीस ठाणे करीत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक  सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!