नाशिक दिनकर गायकवाड काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराला मानणाऱ्या पक्षाला नाशिकरोड येथील नागरिकांनी यापूर्वी घवघवीत यश दिलेले आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यशही मिळेल व काँग्रेसचा सुवर्णकाळ परत येईल,असे प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड आकाश छाजेड यांनी केले.आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी करण्याची संधी देण्यात येईल.आघाडी झाली तरी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवला जाईल,असे मत यावेळी त्यांनी मांडले.
नाशिक रोड मध्य महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे,ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव,पोपट हगवणे, मा. नगरसेविका वत्सला खैरे, महिला आघाडीच्या स्वाती जाधव, नाशिकरोड प्रभारी जावेद इब्राहिम, पूर्व विधानसभा युवक काँग्रेस
अध्यक्ष जावेद पठाण,महिला काँग्रेस अध्यक्ष कुसुम चव्हाण, शहर सरचिटणीस अनिल बहोत, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष हिरे, देवळाली कॅम्प शहराध्यक्ष अजिज शेख,शहर सचिव शाहिद शेख,प्रकाश खळे, ब्लॉक उपाध्यक्ष अकील कादरी, पुका गांगुर्डे, सरचिटणीस ॲड. सूर्यवंशी, नाशिकरोड ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष किशन पाटील, युवक
काँग्रेस शहर महासचिव शिवाजी गंभीरे, ज्येष्ठ उपाध्यक्ष जितू बाराते, राजू रिपोर्ट, लीलावती पवार, पूर्व विधानसभा उपाध्यक्ष अझरोद्दीन शेख, सुनील शिंदे, गौरव पेंढारी, अजिज खान आदी उपस्थित होते.
राहुल दिवे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार चाचणी करताना युवा कार्यकर्त्यांना संधी प्राप्त होईल.लवकरच प्रभागनिहाय पक्षाचे कार्यक्रम केले जातील.ज्येष्ठ, युवा व महिला कार्यकर्त्यांना संघटनेच्या प्रवाहामध्ये संधी मिळेल. आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी बूथ स्तरावर काम करून मतदारयाद्या घरोघरी जाऊन
तपासल्या पाहिजेत व प्रत्येक प्रभागात इच्छुकांनी आतापासूनच ताकदीने कामाला सुरुवात करावी, काम करणाऱ्यांना पक्ष न्याय देईल.
यावेळी आकाश छाजेड पुढे म्हणाले, की आज नाशिकरोड येथे होणाऱ्या वोट चोर, गद्दी छोड या कार्यक्रमाची रूपरेषा आणि संघटन बळकटीसाठी अधिक प्रयत्न करून नाशिकरोडमध्ये काँग्रेस पक्षाला वैभव प्राप्त करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची आवश्यकता आहे.नवनिर्वाचित नाशिकरोड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
