श्रीरामपूर दिपक कदम विजयादशमी निमित्त श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ५१ फूट उंच भव्य रावण दहन कार्यक्रमाने यंदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.परिवर्तन समितीच्या वतीने रावणावर लिहिण्यात आलेल्या "बोकांडीच" या घोषवाक्याने सर्वांचे लक्ष वेधले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी हे घोषवाक्य शहरात सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरले आहे. कामगार नेते नागेश सावंत, शिवसेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष सचिन बडदे, आणि 'आप'चे तिलक डुंगरवाल यांच्या वतीने या भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी शहरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. या रावण दहन कार्यक्रमास सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी स्त्री शक्तीचा सन्मान करत सौ.सविता सावंत,सौ चारुशीला डुंगरवाल, सौ भाग्यश्री बडदे,सौ.सुषमा पवार,सौ.रेणुका डेंगळे,सौ.प्रिया सावंत, सौ.नीता भालेराव,सौ. सोनाली रणपिसे,सौ. अर्चना डेंगळे, सौ लता भोसले,यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार हेमंत ओगले, मा. उपनगराध्यक्ष करण ससाने,भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा उपनगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बियाणे , शिंदे गटाचे सिद्धार्थ मुरकुटे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,
आशिष धनवटे, मनोज लबडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, ज्ञानेश्वर मुरकुटे, व्यापारी असोसिएशनचे मा अध्यक्ष राहुल मुथा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, भाजपाचे रुपेश हरकल, योगेश ओझा, संजय गांगड, निलेश नागले, दिलीप भिसे, कुणाल करंडे,
सुरेंद्र संगम, सनी मंडलिक, अक्षय गाडेकर, युवराज घोरपडे, प्रवीण राठोड,भाऊसाहेब गंगावणे, वैभव कुऱ्हे,समीर ससाने, भाऊसाहेब भोसले, श्रीधर कराळे, अखंड मराठा समाजाचे सुरेश कांगूणे, शरद मामा नवले, सुशील शिरसाट, बंडू शिंदे, नितीन हारदे, राज डेंगळे, भैरव शेठ मोरे, अभी गोसावी, मनोज गाडे, दिनेश यादव, श्रीराम दळवी , यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थित होते यंदाच्या वर्षी परिवर्तन समितीच्या वतीने रावणावर लिहिलेल्या "बोकांडीच" या श्लोगणाचे नेमके राजकीय संदर्भ काय आहेत, याबद्दल शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आगामी पालिका ,जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर 'परिवर्तन'चा संदेश देणाऱ्या या घोषणेने, स्थानिक राजकारणातील 'रावणरूपी' समस्यांवर नेमके बोट ठेवले असल्याची चर्चा नागरिक दबक्या आवाजात सुरू झाली आहे. रावण दहनाच्या निमित्ताने शहरातील विविध पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने, राजकीय सौहार्दाचे चित्र देखील पहायला मिळाले, मात्र त्याच वेळी, 'बोकांडीच' श्लोगणामुळे निवडणुकीच्या राजकारणाची नांदी झाल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल पवार,अमोल सावंत, आर्टिस्ट महेश आघाडे,यासीन भाई सय्यद,रोहित भोसले,भगवान सोनवणे, जहीर सलीम शेख,राहुल रणपिसे,जयेश सावंत,शिवाजी सावंत, रोहित भोसले,भरत डेंगळे, तेजस ऊडे, विकी गोरे, राहुल डुकरे,
अजीम पठाण, अर्जुन मांजरे,आदींनी विशेष प्रयत्न केले, यावेळी विशेष सहकार्य नगरपालिकेचे प्रशासक प्रांताधिकारी डीवायएसपी तहसीलदार,पोलीस निरीक्षक, नगरपालिकेचे मुख्य अधिकार ,अतिक्रमण विभागाचे संजय शेळके, यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके तसेच शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्तात संख्या शहरवासीयांच्या साक्षीने हा रावण दहन कार्यक्रम संपन्न झाला.
