आश्वी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावात एकाच कुटुंबातील पुतण्या व चुलतीच्या एका दिवसाच्या अंतराने झालेल्या दुःखद निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे या हृदयद्रावक घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
येथील समाजसेवक शिवाजी गायकवाड यांचे अनपेक्षित निधन झाल्याने गावकऱ्यांना आतीव दुःख झाले आहे,गावचे धर्मप्रेमी,समाजसेवक आणि प.पू. पुंजाआईं मातेचे निष्ठावान भक्त म्हणून ओळखले जाणारे,तसेच प्रवरा उद्योग समूहातील सेवानिवृत्त अधिकारी शिवाजी म्हातारबा गायकवाड (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले.
धार्मिक कार्य,अन्नदान आणि सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रस्थानी राहून समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे होते. त्यांच्या निधनाने आश्वी परिसरात एक समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, मुली ,जावई, बहीनी मेव्हणे भावजया चुलत भाऊ पुतणे आणि मोठा परिवार आहे. प्रगतशिल शेतकरी राहुल मारुती गायकवाड यांचे चुलते तर ऋषी गायकवाड पप्पु गायकवाड यांचे वडील होत.या दुःखमय घटनेने जनतेच्या डोळ्यातील अश्रू सुकते ना सुकते तेच
चुलती सौ.सोनाबाई माधव गायकवाड यांचेही दुःखद निधन
शिवाजी गायकवाड यांच्या निधनाच्या अवघ्या एक दिवसानंतर, त्याच कुटुंबातील त्यांच्या चुलती सौ. सोनाबाई माधवराव गायकवाड (वय ७२) यांचेही शनिवार, दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुना, मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सौ. सोनाबाई या सामाजिक कार्यकर्ते प्रगतशिल शेतकरी माधवराव गायकवाड यांच्या पत्नी, रावसाहेब गायकवाड यांच्या मातोश्री, तसेच मा. ग्रामपंचायत सदस्य गणेश प्रमोद गायकवाड, राहुल प्रमोद गायकवाड अक्षय रावसाहेब गायकवाड व ‘भाऊ प्रतिष्ठान’चे संस्थापक विकास साहेबराव गायकवाड यांच्या आजी होत.
एका दिवसाच्या अंतराने पुतण्या व चुलतीचे निधन झाल्यामुळे गायकवाड कुटुंबावर मोठे आघात झाले आहेत. या दुःखद प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि मित्रपरिवाराने गायकवाड कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुहेरी धक्क्यामुळे संपूर्ण आश्वी खुर्द परिसरात सध्या हळहळ व्यक्त होत आहे.
