संगमनेर प्नतिनिधी पंचायत समिती सभापतीपदाची सोडत नुकतीच जाहीर झाली यामध्ये अनुसूचित जातीचा सभापती यासाठी आरक्षण आरक्षित झालेले असून त्यामध्ये संगमनेर तालुक्यातून दोन गण म्हणजे वडगाव पान आणि घुलेवाडी अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे,वडगाव पान महिलांसाठी तर पुरुषांसाठी घुलेवाडी गण आरक्षित आहे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असताना येथील जनतेतून बंटी तथा संदीप यादव यांनी काँग्रेसकडून उमेदवारी करावी अशी मागणी होत आहे.अनेकांनी बंटी यादव यांच्याबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे विनंती करत म्हटले आहे की बंटी यादव हे अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष,
जोर्वे ग्रामपंचायतचे माजी सदस्य,शांत संयमी अभ्यासू सर्वांना सोबत घेऊन जाणारा, प्रचंड संघटनात्मक कौशल्य असलेला, प्रत्येक जातीत समूहा बरोबर जिव्हाळ्याचे आपुलकीचे सामाजिक राजकीय सबंध असलेला कोणाच्याही मदतीला तत्पर धावून जाणारा एक निष्कलंक चेहरा आहे.
ग्रामपंचायत तहसील जिल्हा परिषद ते पंचायत समिती कामा संदर्भात विस्तृत माहिती आणि जाण असलेला गेले दहा-बारा वर्ष काँग्रेसचे विचार शोषित वंचित तळागाळातील घटकांपर्यंत पोचवणारा,एक पट्टीचा वक्ता,राजकीय विश्लेषक,थोरात कुटुंबीयांशी
सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्याशी नेहमी परिचित असलेला कायम काँग्रेसशी एकनिष्ठ प्रामाणिक असलेले तसेच जोर्वे गावात सतत क्रियाशील असलेले एक वैचारिक काँग्रेसी बंटी तथा संदीप यादव यांना घुलेवाडी गणा मधून आपल्या नेतृत्वाखाली समाजसेवा करण्याची संधी द्यावी ही सर्व संगमनेर तालुका शहर काँग्रेस व सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे व आम्हाला खात्री आहे.बंटी यादव आपल्या या जबाबदारीला कधी तडा जाऊ देणार नाही.अशी मागणी येथील मतदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.
