विठ्ठलाच्या भक्तीत महादेव दिसतो-पंडीत प्रदिप मिश्रा

Cityline Media
0
झरेकाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे “विठ्ठल विठ्ठल चले,आयेंगे त्रिपुरारी” या भजनाच्‍या ठेक्‍यावर लाखो शिवभक्‍तांनी ठेका धरून शिवपुराण कथेमध्‍ये पंढरीच्‍या पांडुरंगाचा धावा केला. विश्‍वातील सर्वात विशाल मंदिर हे पंढरपुरच्‍या पांडुरंगाचे आहे. जिथे कोणीही माथा टेकवू शकतो, चरण स्‍पर्श करु शकतो त्‍या पांडुरंगाच्‍या मस्‍तकावरच शिवलिंग विराजमान आहे. विठ्ठलाच्‍या भक्‍तीत सुध्‍दा महादेवच पाहायला मिळत असल्‍याचा संदेश पंडित प्रदिप मिश्रा यांनी दिला.शिवपुराण कथेच्‍या चौथ्‍या दिवशी अस्‍तगाव माथा येथील शिवनगरीत गर्दीने उच्‍चांक मोडला,जिल्‍ह्या बरोबरच राज्यातील विविध भागांमधून मोठ्या संख्‍येने भक्‍त शिवनगरीत दाखल झाले असून,भाविकांचा हा भवसागर विठ्ठल भक्‍तीचा मळा फुलवूत आज शिवआराधणेत तल्‍लीन होवून गेला. जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे, आ.आशुतोष काळे,आ.किरण लहामटे, माजी मंत्री आण्णासाहेब म्‍हस्‍के, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे, शिवपुराण कथेचे संयोजक डॉ.सुजय विखे यांच्‍यासह जिल्‍ह्यासह राज्‍यातील अनेक मान्‍यवर याप्रसंगी उपस्थित होते.
पंडित मिश्रा महाराज यांनी पांडुरंगाचा उल्‍लेख करुन, आषाडी वारीला लाखो भाविक वारीच्‍या माध्‍यमातून पंढरपुरला जातात.भगवान शंकरांनी सुध्‍दा पार्वतीला घेवून,पंढरीची वारी केली, कैलास पर्वतावरुन काशी आणि पंढरी अशी त्‍यांनी केलेली वारी पंढरीत आली. भाविकांच्‍या  गर्दीत पांडुरंगानेच भगवान शंकरांना आपल्‍या डोक्‍यावर बसवून नले असा पौराणीक दाखल देवून आजही विठ्ठलाच्‍या मस्‍तकावर शिवलिंग विराजमान असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

    शंकराची आराधना करायची असेल तर, अविरत साधणा करावी लागेल.स्‍वच्‍छ शरीराप्रमाणे मनाची शुध्‍दताही ठेवावी लागेल.आत्‍म्‍याची पवित्रता राखली गेली तर, मनाची पवित्रता वाढेल असे स्‍पष्‍ट करुन, पंडित मिश्रा म्‍हणाले की,मनाच्‍या पवित्रतेमुळेच भगवान शंकराची शरणागती होवू शकेल. शिवपुराण कथा ऐकून मन स्‍वच्‍छ होईल.पर्वत आणि नदीचे उदहरण देवून पर्वताला सोडून नदी वाहून जाते.याचे कारण पर्वत कठोर आहे. जीवनामध्‍ये पर्वता इतके कठोर वागू नका, नाहीतर लोक तुम्‍हाला सोडून जातील. शिवपुराण कथा लोकांशी चांगले नाते निर्माण करायला शिकवते. आयुष्‍यात तोंडी आणि लेखी अशा दोन परिक्षा माणासांना द्याव्‍या लागतात. लेखी परिक्षेत गुण कमी जास्‍त होवू शकतात. मात्र तोंडी परिक्षेत तुम्‍ही जे बोलता त्‍यावरच गुण ठरत आसतात. महादेवांना प्राप्‍त करायचे असेल तर, मौखीक परिक्षेस उतरावे लागेल. शिवाचा जप सातत्‍याने करावा लागेल.

       शिर्डीमध्‍ये यापुर्वीही अनेक मोठ्या कथा झाल्‍या. अनेक चांगले वक्‍ते  आणि श्रोते आले असतील, त्‍यांना माझे नमन आहे असे सांगून मिश्रा महाराज म्‍हणाले की, कोणत्‍याही कथेला वेळ घालविण्‍यासाठी जावू नका, शिवपुराण कथा सुध्‍दा मनाने एैका, भगवान शंकराशी मनाचा संवाद साधणारी ही एक सेवा आहे. आयुष्‍यात सर्वात विचित्र दान हे कन्‍यादान आहे. वडील आपले सर्व सुख मुलीच्‍या रुपाने दान करतात त्‍याची किंमत समोरच्‍याला किती समजतात हे माहीत नाही. पण वडीलांचे दुख हे फक्‍त  मुलीच समजू शकतात हे उदाहरण देवून पंडित मिश्रा म्‍हणाले की, संसारात सर्वांना बरोबर घेवून चला. कार्तिक महीन्‍यातील हे शिवपुराण खुप पवित्र असे ठरले असल्‍याचा उल्‍लेख त्‍यांनी आवर्जुन केला.
गर्दीचा उच्चांक मोडणाऱ्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमास जनसेवा फाउंडेशन कडून सुविधा 
सलग चार दिवस शिवपुराण कथेला भाविक मोठ्या संख्‍येने येत आहेत. सुयोग्‍य नियोजनामुळे भाविकांची कुठेही अडचण होवू नये अशी व्‍यवस्था जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आली आहे.चौथ्‍या दिवशी गर्दीचा उच्‍चांक मोडल्‍यामुळे आहे तिथेच बसण्‍याचे आवाहन संयोजकांच्‍या वतीने करण्‍यात येत होते. मंत्री नामदार राधाकृष्‍ण विखे, डॉ.सुजय विखे यांच्‍यासह सर्व स्‍वयंसेवक भाविकांना बसविण्‍यासाठी नियोजनामध्‍ये सक्रीयपणे पाहायला मिळाले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!