मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.या सोहळ्यास उपस्थित राहून शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.जिथे जिल्हानिहाय अधिकारी व पालकमंत्र्यांकडून एकाच वेळेस १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याचं काम करण्यात आलं.राज्याचे सूत्र जर अभ्यासू व धोरणी नेतृत्वाच्या हाती असेल तर काय किमया घडू शकते, याचा ऐतिहासिक प्रत्यय महाराष्ट्राने अनुभवला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे,पणन मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
