नाशिक दिनकर गायकवाड मीना भुजबळ स्कूल ऑफ एक्सलन्सच्या कॅम्पसमध्ये आनंदोत्सव ३.० चे आयोजन करण्यात आले होते. मीना भुजबळ - स्कूल ऑफ एक्सलन्स आणि भुजबळ नॉलेज सिटीचे विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी यांनी या उत्सवाचा आनंद लुटला.
छाया ईश्वरी भागवत
भुजबळ नॉलेज सिटीच्या फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर सर यांनी या आनंदोत्सवाचे उद्घाटन केले. त्यांच्यासोबत भुजबळ अकादमी ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्सचे प्राचार्य डॉ. अनिल कोकाटे,एम. ई. टी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे
डॉ. योगेश गायकवाड आणि ट्रस्ट ऑफिसचे पदाधिकारी तसेच मीना भुजबळ स्कूल ऑफ एक्सलन्सच्या प्राचार्या शुभ्रा वर्मा व मान्यवर आणि स्टाफ उपस्थित होते. विद्यार्थी आणि पालकांनी फूड स्टॉल, गेम्स स्टॉल,तसेच दिवाळीच्या वस्तूंचे स्टॉल खास करून एक वस्तू बनवणे व खरेदी आणि विक्री या संदर्भातील म्हणजेच फायनान्शिअल लिटरसी संदर्भात शिक्षण घेण्याच्या दृष्टीने उभारले होते. यामध्ये स्टाफ आणि पालकांचा सहभाग अतिशय महत्त्वपूर्ण होता. विद्यार्थ्यांनी वस्तूंच्या संदर्भात खास करून काही वस्तू ह्या बेस्ट आऊट ऑफ
वेस्ट आणि तसेच दिवाळी उपयोगी साहित्य यासंदर्भात मांडले होते संगीत विभागातील हेमांगी कवठकेकर, रोहित उन्हवणे आणि अमोल अहिरे यांनी त्यांच्या नृत्य आणि संगीताच्या सादरीकरणाने उत्सवात चमक आणली.
