कॉपर चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणुन ३,५९,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
कर्जत प्नतिनिधी फिर्यादी नागेश पांडुरंग पवार रा. राशिन ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यांचे राशिन ते काळेवाडी जाणारे रोडलगत असलेले शिवम मशिनरी ऍ़ण्ड स्टुल्स दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने उचकटुन दुकानातील ६४,००० रुपये किमतीचे कॉपर वायर चोरुन नेलेली आहे. सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५०८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१331(४), ३०५3(ऐ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांचे दुकाने फोडुन दुकानातील कॉपर वायर चोरीच्या वारंवार घटना होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे पोलीस यांनी स्थानिक गुन्हे शाखेस कॉपर चोरी करणारे आरोपींची माहिती घेवून गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, आकाश काळे, बाळासाहेब खेडकर, महादेव भांड, अरुण मोरे,महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास कॉपर चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
पथकाने अहिल्यागर जिल्ह्यातील कॉपर चोरीचे घटनां ठिकाणी भेट देवुन घटना ठिकाणची माहिती संकलित केली तसेच अशाप्रकारे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेण्यात आली.कॉपर चोरीच्या घटना ठिकाणची व्यवसायिक कौशल्याचे आधारे माहिती घेतली असता बहुतांश ठिकाणी तोंडास मास्क बांधलेले सहा ते सात आरोपी असल्याचे दिसुन आले. पथकाने सलग आठ दिवस तपास करुन आरोपींनी गुन्ह्यामध्ये वापरलेली चार चाकी गाडी निष्पन्न केली.
सदर चार चाकी गाडी वापरणारे इसमांची माहिती काढली असता सदरची गाडी ही रेकॉर्डवरील आरोपी महादेव पवार रा. अकलुज, सोलापुर हा वापरत असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर इसमाचा शोध घेत असतांना तो त्याचे साथीदारासह त्याचे राहते घरी आलेला असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर माहितीनुसार नमुद इसमाचे घरी जावुन त्याचा शोध घेता १) महादेव रंगनाथ पवार (वय ४८) वर्ष रा.एकवीस चारी माळीनगर अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर, २) दादा लाला काळे (वय १९) वर्ष रा. सवतगाव ता. माळशिरस जि. सोलापुर असे मिळुन आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे ३) रामा लंग्या काळे रा. तुळजापुर नाका जुना डेपो, पारधी पेढी ता. जि. धाराशीव (फरार) ४) महादेव बाबु काळे रा. तुळजापुर नाका जुना डेपो, पारधी पेढी ता. जि. धाराशीव (फरार), ५) दिलीप मोहन पवार रा.एकवीस चारी माळी नगर ता. माळशिरस जि. सोलापुर (फरार) ६) सुरेश नामु काळे रा. सवतगाव ता. माळशिरस जि. सोलापुर (फरार), ७) सुरेश नामदेव चव्हाण रा. सवतगाव, ता. माळशिरस जि. सोलापुर (फरार) यांचेसह गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे.
ताब्यातील आरोपींनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे ३,५९,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे त्यांनी अशाप्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांचेकडुन अहिल्यानगर जिल्हा व सोलापुर जिल्ह्यातील खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम १ कर्जत, जि. अहिल्यानगर ५०८/२०२५ बी.एन.एस. २०१३ चे क. ३३१(४), ३०५(अ)२कर्जत, जि. अहिल्यानगर ५२५/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे क. ३३१(४), ३०५(अ)३ अकलुज, जि. सोलापुर ५५३/२०२५बी.एन.एस. २०२३ चे क. ३०५(अ)३३१(४)
4४पंढरपुर, जि. सोलापुर ३०५/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे क. ३०५(अ),३३१(४)
५ अकलुज, जि. सोलापुर ३३०/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे क. ३०३(२),
६ माळशिरस जि. सोलापुर ३९१/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे क. ३०३303(२)
७ करमाळा, जि. सोलापुर ७८३/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे क. ३०५(अ)
८ वैराग, जि. सोलापुर २४१/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे क. ३०५(अ),३३४(१)
आरोपी नामे महादेव रंगनाथ पवार हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी खालीलप्रमाणे सोलापुर, धाराशिव, सातारा, रायगड व पुणे जिल्ह्यामध्ये दरोड, घरफोडी व चोरीचे एकुण १३ गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
१ अकलुज जि. सोलापुर ५३५/२०२० भा.द.वि. क.४५७ , ३८०, ३४
२वळसंग, जि. सोलापुर २८२/२०२३ भा.द.वि. क. ३८०, ४५७, ३४
३ टेभुर्णी, जि. सोलापुर २०४/२०१८ भा.द.वि. क. ४५७, ३८०, ;३४
४ टेंभुर्णी, जि. सोलापुर २४९/२०१८ भा.द.वि. क. ४५७, ३८०
५ कुरुडवाडी जि. सोलापुर १११/२००८ भा.द.वि. क. ३८९
६ नातेपुते, जि. सोलापुर १६८/२०१८ भा.द.वि. क. ४५४, ४५७, ३८०
७ वडुज, जि. सातारा १८६/२०१८ भा.द.वि. क. ४६१, ३८०, .३४
८म्हसवड, जि. सातारा ६८/२०१८2 भा.द.वि. क. ४५७, ३८०
9 कराड शहर, जि. सातारा २१०/२०१२ भा.द.वि. क. ४५७, ३८०, ४११, ३४
१० उमरगा, जि. धाराशिव ,२७७/२०१३ भा.द.वि. क. ३९५
११ मुरुम, जि. धाराशिव ११२४/२०१३ भा.द.वि. क. ३९५
१२ वालचंदनगर, जि. पुणे १५३/२०१० भा.द.वि. क. ४५७, ३८०
१३ कळंबोली, जि. रायगड ९४/१९९१ भा.द.वि. क. ४५७, ३८० ताब्यातील आरोपींना कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. ५०८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(४), ३०५(ऐ) गुन्ह्याचे तपासकामी कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
