आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय,मांची हिलच्या प्राचार्य डॉ.श्यामल निर्मळ यांची कन्या कु. शुक्तीका प्रकाश निर्मळ हिने नुकतीच एम.एफ.एम. (मास्टर्स ऑफ फॅशन मॅनेजमेंट) ही पदवी विशेष प्राविण्याने संपादन करून कुटुंबाच्या आणि संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.शुक्तीका निर्मळ हिने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.एस्सी अनिमेशन पदवी घेतल्यानंतर,टेक्सटाईल मिनिस्ट्री,भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या एन.आय.आफ.टी.महाविद्यालय भोपाळ येथून एम.एफ.एम. ही पदव्युत्तर पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केली आहे.
१९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या पदवीदान समारंभात राज्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री नामदार पबित्रा मार्गेरीटा यांच्या हस्ते तिला पदवी प्रदान करण्यात आली.
शुक्तीकाचे वडील प्रकाश निर्मळ हे कथाकार व भाषा अभ्यासक असून त्यांनी हिंदी भाषेत 'ळ' वर्ण समाविष्ट करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.
आई डॉ.श्यामल प्रकाश निर्मळ या अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज, मांची हिल येथे प्राचार्यपदी कार्यरत आहेत.पालकांच्या क्षेत्रापेक्षा वेगळे क्षेत्र निवडून शुक्तीकाने जिद्द आणि अथक परिश्रमाच्या बळावर स्वतःचे स्वप्न साकार केले आहे.
या उत्तुंग यशाबद्दल मांची हिल संस्थानचे संस्थापक शाळीग्राम होडगर ,संस्थेचे विश्वस्त तथा लीलावती हॉस्पिटल,मुंबई येथे कार्यरत असलेले डॉ.शैलेन्द्रसिंह होडगर,संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे,उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, सचिव नीलिमा गुणे, प्रमुख लेखाधिकारी राजू बोंद्रे,दवाखान्याचे प्रशासकीय अधिकारी दत्ता शिंदे,डॉ.संजीव लोखंडे, डॉ. शिवपाल खंडीझोड, तसेच कार्यालयीन अधीक्षक रंगनाथ गिते यांसह संपूर्ण मांचीहिल परिवाराने तिचे अभिनंदन केले आहे. कु. शुक्तीका हिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
