खळी सेवा सोसायटी खत डेपो सुरू करणार

Cityline Media
0
 दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे दिवाळी पूर्व शेतकऱ्यांसाठी खतमालाचा व कृषी सेवा केंद्र सुरू करणार असल्याची माहिती  अध्यक्ष सूर्यभान सानप यांनी दिली खळी येथे सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सूर्यभान दगडू सानप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती.
यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना श्री सानप बोलत होते सभेसाठी उपाध्यक्ष हौशीराम नागरे राजहंस दूध संघाचे उपाध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र चकोर जनसेवा मंडळाचे नेते सुरेश नागरे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर वाघमारे मा.अध्यक्ष सोन्याबापु लबडे, सिताराम लबडे तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब लहाने सह्याद्री विद्या प्रसारक समाज संस्थेचे विद्यमान संचालक चंद्रभान तांबे सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक दिलीप तांबे साहेबराव तांबे सोमनाथ नागरे बाबुराव बाळाजी नागरे कामगार पोलीस पाटील मच्छिंद्र चकोर गोरख नागरे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सेवा सोसायटीची सभा सुरू झाली.

यावेळी संस्थेचे सचिव शिवाजी साबळे यांनी संस्थेच्या अंदाजपत्रक वाचन केले व मागील अंदाज पत्राला मंजुरी देत नवीन विषयांमध्ये शेतकऱ्यांसाठी नवीन खत डेपो सीएसटी केंद्र सुरू करणे,कृषी सेवा केंद्र सुरू करणे स्वस्त धान्य दुकानाच्या वेळेमध्ये बदल करणे कर्मचाऱ्यांनी दहा ते पाच या वेळेमध्ये मुख्यालय ठिकाणी थांबणे रेशन आल्यापासून संपेपर्यंत सर्व नागरिकांना रेशन मिळावे या दृष्टिकोनातून दिवसभर दुकान चालू ठेवणे आधी चर्चा करण्यात आली याप्रसंगी सेवा सोसायटीचे सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या सभेमध्ये सरकारने शेतकरी कर्जमाफी करून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला एक तरी ५० हजार रुपयाची मदत करावी तसेच शासनाने दिवाळीपूर्वी सरसकट कर्जमाफी करावी तसेच सेवा सोसायटीच्या वतीने सभासदांसाठी अपघात विमा उतरावा अशी मागणी नागरिक वर्गातून केली आहे सदर वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी शिवाजी भिकाजी वाघमारे मदतनीस मधुकर वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!