-शेतकऱ्यांची मागणी.
दाढ खुर्दचे कृतिशील सरपंच सतिश जोशी गेले शेतकऱ्यांच्या मदतीला धावून.
दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिबलापूर मंडल मध्ये अतिवृष्टीने प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने येथे शेतीची मोठी नुकसान झाली असून येथील शेतकऱ्यांचे घर गोठे छोटी पानंद रस्ते पाण्यामध्ये वाहून गेल्याने व घराची पडझड झाल्याने व पिकामध्ये पिकाच्या उंचीपेक्षा जास्त पाणी साठल्याने कपाशी बाजरी तूर मठ मुग आधी महत्वाची पिके पाण्यामध्ये सोडून गेल्यामुळे या भागातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यामुळे येथील शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाणार आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे राहता तालुक्याप्रमाणे संगमनेर तालुक्यातील शिबलापुर मंडळ येथील पिकाची व घराची व वाहून गेलेला रस्त्यांची सरसकट पंचनामे करून येथील शेतकऱ्याला भरघोस मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
येथील शेतकऱ्यांने मोठे कष्टाने पीक उभे केले असून पीक काढण्याच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने येथील शेतकरी हवालदील झाला असून खरीप हंगाम पिकाचे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न विचारला जात आहे शेतकऱ्यांनी सोसायटी सहकारी बँक कर्ज खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज घेतले असून पिक उभे केले होते.
ते अतिवृष्टीमुळे हातातून गेले आता ते फेडायचे कसे? या चिंतेत असून येथील शेतकऱ्यांची दिवाळी चांगली करायची असेल तर येथील शेतकऱ्याला एक तरी ५० हजार रुपयाची मदत सरसकट जाहीर करावी अशी मागणी येथील किशोर जोशी सुनील जोशी कैलास जोरी
दगडू साळवे नितीन पाबळे शरद गीते किशोर वाघमारे राजेंद्र जमदाडे भाऊसाहेब जमदाडे रावसाहेब जमदाडे तुकाराम जोशी आदी सजग कार्यकर्त्यांनी चनेगाव येथील तलाठी श्रीमती अनुपमा गांगुर्डे खळी तलाठी अंकित मंडलिक ग्रामसेवक अनिल वाणी दाढ खुर्द ग्रामसेवक श्री.चांडे यांच्याकडे केली.
दाढ खुर्द गावचे प्रथम नागरिक तथा कृतिशील सरपंच सरपंच सतीश जोशी यांनी तलाठी ग्रामसेवक यांना बोलावून दाढ खुर्द गावातील भावका रबाजी जोशी यांच्या घराची भिंत पडली असून त्यांच्या घराच्या पंचनामा केला असून उर्वरित शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली.
तलाठी श्रीमती गांगुर्डे व ग्रामसेवक श्री. चांडे यांना समवेत घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली तसेच वाहून गेलेले गावातील दोन मुख्य हरणदरा रस्ता व पाच मोऱ्या रस्ता हनुमानवाडी येथील ओढ्याचे पाणी तसेच बुधे वस्ती येथील रस्त्याची पाहणी करून गावांमधील ओढे व तळे येथील अतिक्रमण काढून तेथे पंचनामे करावे अशी मागणी सरपंच सतीश जोशी यांनी केली शासनाने या दोन्हीही गावांमध्ये सरसकट पंचनामे करून भरघोस मदत जाहीर करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.
