दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील चणेगाव येथे गेल्या ८० वर्षाच्या कालखंडात उच्चांकी पाऊस झाला असून चनेगाव मध्ये गावाला जोडणारे सर्व रस्ते जलमय झाले असून रस्त्यावरची माती खडीसह डांबरासह सर्व रस्ते पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले असून चनेगाव गावांमधील विहिरी पुराच्या पाण्याने तुडुंब भरले असून त्याने गावांमध्ये असणारे शेतातील उभे पिके पूर्णपणे पाण्यामध्ये गेले आहे अशी माहिती येथील कृषी भूषण डॉ. विठ्ठलदास असावा यांनी दिली आहे.
शुक्रवार शनिवार रविवार चनेगाव येथे रात्रभर व दिवसा अतिवृष्टीचा भरपूर पाऊस झाल्यामुळे येथील उभे असणारे पिके कपाशी बाजरी मका तूर मठ मुग यासारखे प्रमुख पिके पूर्णपणे पाण्यामध्ये बुडून गेले असून गावातील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलदास असावा यांनी गावच्या कामगार तलाठी श्रीमती अनुपमा गांगुर्डे व ग्रामसेवक यांना दूरध्वनी वरून माहिती देत चनेगाव गावांमधील परिस्थितीची माहिती दिली.
तात्काळ प्रशासनाने चणेगाव येथे येऊन जेसीबीच्या सहाय्याने शेतकऱ्याच्या असणारे मोठमोठे बांध जेसीबीने फोडून नदी व कॅनलच्या बाजूने पाणी काढून दिले परंतु पाण्याचा असलेला दाब सर्वांच्या आवाक्याबाहेरचा होता त्यामुळे येथे असणारे शेतातील उभ्या पिकामध्ये गेले तीन दिवस झाले खूप पाणी असून सर्व पिके पाण्यामध्ये बुडून गेले आहे.
गावाला जोडणारे चणेगाव दाढ रस्ता चनेगाव खळी जोड रस्ता चनेगाव झरेकाठी रस्ता पूर्णपणे वाहून गेल्यामुळे येथील रस्त्यासह शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या जनावरांचे गोठे घर जमीन दोस्त झाले आहे व शेतीची फार मोठी नुकसान झाले आहे.
शासनाने येथे विशेष लक्ष घालून कोणतेही अट न घालता येथील शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत व नुकसान झालेल्या घरांना भरपाई मिळावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विठ्ठलदास असावा यांनी महाराष्ट्र शासनाकडे संगमनेर तहसीलदार यांच्याकडे केले आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये आश्वी गटामध्ये चनेगाव हे गाव असून या गावासह शेजारील खळी दाढ खुर्द झरेकाठी शिबलापूर सादतपूर आश्वी खुर्द बुद्रुक निमगाव जाळी चिंचपूर औरंगपूर प्रचंड पाऊस झाला असून प्रचंड नुकसान येथे झाले आहे त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये संगमनेर तालुक्यातील आश्वी गटातील गावांची समावेश करून कोणतीही अट न घालता सरसकट शेतकऱ्याला मदत करून येथील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी.
अशी मागणी दाढ खुर्द येथील बाबासाहेब वाडगे सिताराम साळवे त्रिंबक जोरी किशोर वाघमारे किशोर जोशी झरेकाठी येथील ॲड पोपट वाणी पोलीस पाटील सुदामा वाणी बापूसाहेब वाणी बापू तोंडे सुनील वाघमारे संदीप मनकाळे खळी येथील सुरेश नागरे शिवाजी वाघमारे
गोरक्षनाथ नागरे सचिन आव्हाड सोमनाथ नागरे पिंपरी येथील भारत गीते विजय कदम शिवाजी कदम शिबलापूर येथील रवी मुन्तोडे निमगाव जाळी येथील संजय भोसले सोमनाथ खरात आधी कार्यकर्त्यांनी संगमनेर तहसीलदार यांच्याकडे विशेष विनंती करून अहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांनी राहता तालुक्यासह संगमनेर तालुक्यातील आश्वी गटातील या गावाचा समावेश करून येथील शेतकऱ्याला भरघोस मदत मिळवून द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
