धानोरे येथे जखमी बिबट्यास भूल देऊन केले जेरबंद

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे राहुरी तालुक्यातील धानोरे गावातील रमेश सुखदेव दिघे यांच्या शेतात वन विभागाने एका जखमी बिबट्यास भूल देऊन जेरबंद केले.
शुक्रवारी सकाळी  रमेश सुखदेव दिघे हे त्यांच्या गट नंबर ३२०/२ मध्ये गिनी गवत आणण्यासाठी गेले असता बिबट्या दबकत दबकत त्यांच्या कडे येताना दिसला.ते खुप घाबरले व चारा तेथेच ठेवून माघारी गेले व चार पाच साथीदारांना घेऊन परत आले तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की बिबट्या धडपडत लंगडत चालताना दिसला.

त्यांनी लांबूनच त्याचे निरीक्षण केले तर त्यांना तो जखमी असल्याची खात्री पटली.त्यांनी तात्काळ वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.माहिती मिळताच योगायोगाने म्हस्के सोनगाव मध्येच असल्याने तात्काळ घटना स्थळी पोहचले व परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यांनी अहिल्यानगरचे उपवन संरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी गणेश मिसाळ संगमनेरचे सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी अमरजित पवार राहुरीचे वनपरिक्षेत्र सुनिल साळुंखे यांना माहिती दिली.

माहिती मिळताच राहुरी वनविभागाचे अधिकारी सुनिल साळुंखे,वनपाल एल.पी.शेंडगे, वनरक्षक एस.आर. कोरके, एन. वाय.जाधव, एम एच. पठाण, घनदाट, झावरे,चालक ताराचंद गायकवाड घटना स्थळी पोहचले व परिस्थितीचे व जमावाचे गांभीर्य पाहून संगमनेर बचाव पथकास पाचारण केले.

अहिल्यानगर संगमनेर बचाव पथकाचे बंदूकतज्ञ संतोष पारधी,अरुण साळवे,प्रविण चव्हाण हे पोशाख परिधान करुन व बंदूक पुर्ण क्षमतेने भरुन ट्रॅक्टरच्या सहाय्याने ऊसाच्या शेतात घुसले बिबट्या टप्प्यात आल्याबरोबर संतोष पारधी यांनी पहिल्याच निशाण्यात बिबट्या बेशुद्ध केला.इंजेक्शन मारताना सोनगावचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रदीप सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास डार्ट मारण्यात आला.

बिबट्या बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच प्राणीमित्र व बचाव पथकाचे आणि राहुरी वनविभागाचे कर्मचारी यांनी बिबट्यास झोळी करुन उसातून बाहेर काढले. बचाव केलेला बिबट्या हा मादी जातीचा व सहा ते सात वर्षे वयाचा आहे.बिबट्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि  बघ्यांची खुपच गर्दी जमली व वनविभागाला काम करण्यास अडथळा येत होता या वेळी रमेश दिघे,ललित दिघे,पवन दिघे, सोमनाथ दिघे,पंकज दिघे, जगदीश दिघे प्रदक्ष दिघे कन्हैया दिघे प्रतीक दिघे राहुल दिघे, नितीन दिघे, नंदू दिघे 
अनिल वाकचौरे यांनी गर्दी पांगवण्यासाठी खुप मदत केली.

घटना स्थळी बंदूक निशाणा तज्ञ संतोष पारधी यांनी मोहीम फत्ते केल्याबद्दल व रमेश दिघे यांनी ऊसाचे नुकसान होत असताना सुद्धा ट्रॅक्टर ऊसात जाऊ दिला आणि निर्सगाबद्द्ल इमान राखले दोघांचेही उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!