कांताबाई सातारकर पुरस्काराने कोंडीराम आवळे यांचा होणार यथोचित सन्मान

Cityline Media
0
उद्योग तथा मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांच्‍या हस्ते संगमनेर मध्ये पुरस्काराचे वितरण

संगमनेर नितीनचंद्र भालेराव तमाशा कलावंत दिवंगत कांताबाई सातारकर पुरस्‍कार वाई येथील जेष्‍ठ तमाशा कलावंत व लोक नाट्य लेखक कोंडीराम लक्ष्‍मण आवळे मास्‍तर यांना संगमनेर नगरीत प्रदान करण्यात येणार आहे.
शहरातील मालपाणी लॉन्‍स येथे दिनांक २ नोव्‍हेंबर  रोजी सकाळी १०.३० वाजता राज्‍याचे उद्योग तथा मराठी भाषा  मंत्री नामदार उदय सामंत यांच्‍या हस्ते तसेच जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्‍ण विखे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पुरस्‍कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले आहे.

संगमनेरचे भूमिपुत्र असलेले कवी अनंत फंदी,पहिल्या महिला तमाशा कलावंत पवळा भालेराव,गुलाबबाई संगमनेरकर, लोकशाहीर विठ्ठल उमप,तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्‍या नावाने दरवर्षी राज्‍यातील कलावंताना पुरस्‍कार देवून सन्‍मानित करण्‍याचा निर्णय आमदार अमोल खताळ यांनी जाहीर केला होता.

त्याप्रमाणे पहिला पुरस्‍कार स्व.कांताबाई सातारकर  पुरस्‍कार वाई येथील लोककलावंत कोंडीराम लक्ष्‍मण आवळे यांना देण्‍याचा निर्णय पुरस्‍कार निवड समितीने घेतला आहे.मुंबई विद्यापीठातील कला विभागाचे प्रमुख व गायक प्रा.गणेश चंदनशिवे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पुरस्‍कार निवड समितीने कोंडीराम आवळे मास्तर यांची पुरस्‍कारासाठी निवड केली आहे.

अतिशय बिकट परिस्थितीवर मात करुन, त्‍यांनी पारंपारिक तमाशा कला जिवंत ठेवण्‍यासाठी कष्‍ट घेतले.तमाशा कलेमध्‍ये त्‍यांनी दिलेल्‍या योगदानाचा यथोचित गौरव म्‍हणून आवळे मास्‍तर यांना स्व.कांताबाई सातारकर  पुरस्‍कार देण्यात येणार आहे.
अशी माहिती आमदार खताळ यांनी दिली.

जिल्‍ह्यातील तसेच राज्‍यातील तमाशा क्षेत्रातील असंख्‍य मान्यवर कलाकार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.या पुरस्‍कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्‍याचे आवाहन पुरस्‍कार वितरण समारंभ समितीचे सदस्य जेष्ठ नाट्य लेखक,दिग्दर्शक डॉ.सोमनाथ मुटकुळे,पत्रकार सौ.स्मिता विनय गुणे,
आण्णासाहेब काळे,निलिमा घाटगे,सुशांत पावसे,राहूल सोमवंशी यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!