मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७' बाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
बैठकीत कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा,रस्ते, मलनिस्सारण व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली.
सिंहस्थ कुंभमेळा ही भारतीय संस्कृतीची अत्यंत महत्त्वाची परंपरा असून यावर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या या भव्य धार्मिक उत्सवासाठी गोदावरी नदीच्या जलप्रदूषणाला आळा घालणे,रस्त्यांचे सक्षमीकरण आणि मलनिस्सारणाच्या सुविधा तात्काळ पूर्ण करणे यास प्राथमिकता देण्यात येईल तसेच साधूग्राम व टेंटसिटीसाठी जलद भूसंपादन आणि विविध सुविधा निर्माण करण्याची गती वाढवण्याबाबतही निर्देश दिले गेले आहेत.
मुख्यत्वे,सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनातील सर्व कामे उच्च दर्जाची आणि वेळेत पूर्ण होणारी असावीत, यावर जोर देण्यात आला. सुरक्षितता व्यवस्थापनावर विशेष लक्ष देताना पोलिस निवास, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूक नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षा बाबत कडक उपाययोजना केल्या जातील. ‘डिजिटल कुंभ’ संकल्पनेच्या माध्यमातून प्रचार-प्रसार कार्य चालवले जाईल आणि कुठल्याही नकारात्मक माहितीला तत्काळ उत्तर दिले जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सर्व विभागांना यासाठी तात्काळ निधी मंजूर करण्याचे आणि कामे नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे आदेश दिले, तसेच नागरिकांच्या कोणत्याही समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यात येतील असे स्पष्ट केले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,गिरीष महाजन
जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री,महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री. दादा भुसे, पणनमंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेशकुमार,पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा,आयुक्त श्रीमती मनीषा खत्री, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त श्रीमती करिश्मा नायर तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.
