प्रतिनिधी विशाल वाकचौरे शिर्डीच्या पवित्र साई धामात विश्व हिंदू परिषदच्या धर्माचार्य संपर्क आयाम, महाराष्ट्र-गोवा राज्याच्या तत्वावधानाखाली तीन दिवस (५ ते ७ ऑक्टोबर) चाललेला ‘युवा संत चिंतन वर्ग’ यशस्वीपणे पार पडला.
विदर्भ, देवगिरी,पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण प्रांतांमधून सुमारे ३५० युवा संत, साधू-संत, कीर्तनकार आणि प्रवचनकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन हरिभक्तिपारायण राठी महाराज यांनी केले.दीपप्रज्वलन महामंडलेश्वर स्वामी रमेशगिरी महाराज आणि पूज्य स्वामी शिवानंद सरस्वती महाराज यांनी केले. या सत्रात विहिप केंद्रीय मंत्री अशोक तिवारी, केंद्रीय सहप्रमुख हरी शंकरजी, क्षेत्रीय अधिकारी व धार्मिक विभाग प्रमुख संजय मुरदाळे, प्रांतमंत्री किशोर चव्हाण, ॲड.सतीश गोरडे, नितीन वाटकर , नागनाथ बोंगरगे, संजय कुलकर्णी उपस्थित होते.
चिंतन वर्गात संतांनी समाज प्रबोधन, सनातन मूल्यांचे संवर्धन, धर्मांतरण व सांस्कृतिक अवमूल्यन यासारख्या आव्हानांवर विचार-विमर्श केला. प्रमुख संतांच्या उद्बोधनातून युवा संतांना समाज जागरण, डिजिटल माध्यमातून धर्मप्रसार, मंदिरांना सामाजिक व आध्यात्मिक केंद्र बनविणे यासाठी मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमात चारही प्रांतांच्या प्रांतवार सत्रांमध्ये विभागीय आव्हाने आणि उपाय यावर चर्चा झाली. तसेच महर्षि वाल्मीकि जयंती निमित्त संतांनी रामायणातील आदर्श संदेश स्मरण केले आणि समाज समरसतेसाठी संकल्प घेतला.
कार्यक्रमाच्या तीन दिवसांत संतांनी संघटनबद्ध कार्य, सामाजिक समरसता, धर्मप्रसाराचे नविन मार्ग यावर ठोस विचार मांडले. जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संतांना पर्यावरण संरक्षण आणि नदी प्रदूषण मुक्तीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
शिर्डीतील हा युवा संत चिंतन वर्ग सनातन संस्कृतीच्या पुनर्जननाची आणि ‘विश्वगुरु भारत’ या स्वप्नाची दिशा ठरवणारा ऐतिहासिक कार्यक्रम ठरला.
विभाग मंत्री सुनील खिस्ती, जिल्हामंत्री विशाल वाकचौरे, सहमंत्री सुरेंद्र महाले, बजरंग दल जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक, ईश्वर टिळेकर,शुभम ताम्हाणे, योगेश मखाना, दिपक शिनगर, प्रशांत बहिरट, विठ्ठल रोडे, मिलिंद चवंडके, दीपक भोसले,आकाश कोकाटे, आदित्य वाणी, ऋषभ अग्रवाल, सुदर्शन व दुर्गावाहिनीच्या पूजा लष्करे, गीता परदेशी, आशा महाले, वैष्णवी,कावेरी, सोनाली,समृद्धी आदींनी वर्ग यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.
