नाशिक दिनकर गायकवाड शटरचे बटण व लॉकपट्टी तोडून अज्ञात चोरट्यांनंनंनी शोरूम मध्ये प्रवेश करून महागडे शूज,टी शर्ट, ट्रॅक पँट, जॅकेट, इतर ॲक्सेसरीज व रोकड असा सुमारे १७ लाखांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना पुमा शोरूम येथे घडली.
याबाबत प्रशांत महेश मिश्रा (रा. शिवकृपा, महालक्ष्मीनगर, हिरावाडी, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले,की कॉलेज रोड येथे पुमा शोरूम व ओपन मॉल आहे. दि. ५ ते ६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने या शोरूमच्या सेंटरचे बटण व लॉकपट्टी तोडून शोरूममध्ये प्रवेश
केला. यावेळी अज्ञात चोरट्यांनी शोरूममध्ये असलेले ९ लाख १८ हजार ३८८ रुपये किमतीचे २५६ नग पुमा कंपनीचे शूज, ६ लाख ८५ हजार ९५१ रुपये किमतीचे पुमा कंपनीचे ३३७ नग टी शर्ट ट्रॅक पँट, जाकीट शॉर्ट पँट, ८१ हजार २६७ रुपये किमतीचे पुमा कंपनीचे ५९ नग बॅग सॉक्स, कॅप, बॉटल,
वॉलेट व ९१ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १६ लाख ८५ हजार ६०६ रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
