बलात्काराच्या गुन्ह्यात तुला अडकवु अशी धमकी देत घर मालकाकडे मागितली दहा लाखांची खंडणी

Cityline Media
0
दोघां भाडेकरुंविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक दिनकर गायकवाड भाडेतत्त्वावर घेतलेला फ्लॅट खाली करून पाहिजे असेल,तर दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अशोक केशवराव दुबे (वय ६३, रा. दोनवाडे, ता.जि. नाशिक) यांचा शेतीव्यवसाय असून, उपनगर येथे संघमित्रा हौसिंग सोसायटीजवळ दत्तप्रसाद बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. आरोपी शिबू अन्थोनी जोसेफ व प्रियंका अतुल सोनवणे यांनी भाडेतत्त्वावर हा फ्लॅट घेतला आहे. हा फ्लॅट बळकावण्याच्या इराद्याने आरोपींनी भाडेतत्त्वावर घेतला.

हा फ्लॅट खाली करून पाहिजे असेल, तर दहा लाख रुपये द्यावे लागतील. तरच हा फ्लॅट खाली करून मिळेल, असे शिबू जोसेफ व प्रियंका सोनवणे यांनी सांगितले,तसेच फिर्यादीला प्रियंका वाघ हिने खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये सडवीन व तिचे पंटर तुझा गेम करून टाकीन, अशी धमकी देऊन खंडणी मागितली. हा प्रकार दि. २३ ऑगस्ट रोजी उपनगर येथे राहत्या फ्लॅटमध्ये घडला.

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात शिबू जोसेफ व प्रियंका सोनवणे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!