३,७८,१५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन कत्तलखाने केले जमिन दोस्त
शेवगाव प्रतिनिधी शहर पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त खबऱ्या मार्फत नुकतीच माहिती मिळाली की,शेवगाव पोलीस ठाणे हद्दीतील शेवगाव शहरातील खाटीक गल्ली येथे तीन ठिकाणी बंद घरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री सुरु आहे.
या ठिकाणी कारवाई करण्याकरिता पोसई आजिनाथ कोठाळे, पोहेकाँ चंद्रकांत कुसारे, पोकाँ शाम गुंजाळ, पोकाँ राहुल आठरे, पोकाँ आदिनाथ शिरसाठ, पोकाँ मारोती पाखरे, पोकाँ संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर, पोकाँ रोहीत पालवे, पोकाँ नवनाथ कोठे, मपोहेकाँ गितांजली पाथरकर असे पथक तयार करुन दोन पंच असे खाजगी वाहनाने जावुन खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणावरील खाटीक गल्ली येथे जावुन छापा टाकला.
तेथे ठिकाणी इसम नामे १)अन्वर शेख अन्वर मोहम्मद रा. खाटीक गल्ली शेवगाव, २) वाहीद हरुन कुरेशी, ३) हमजा वाहिद कुरेशी दोघे रा. कुरेशी गल्ली शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर हे मोठ्या प्रमाणावर गोमांस सदृष्य मांस कत्तल करुन विक्री करण्याचे इतर साहित्यसह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एक लाख दोन हजार किंमतीचे गोमांस व दोन लाख शहात्तर हजार एकशे पन्नास रुपये किंमतीचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
वरिल आरोपी विरुध्द शेवगाव पोलीस ठाणे येथे पोकाँ ३ शाम बाबासाहेब गुंजाळ यांचे फिर्यादीवरुन गु.रजि.नं.८६२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२३,२७१,३२५ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ कलम ५, ५ बी, ५ सी, ९ व शस्त्र अधिनियम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे १) वाहीद हरुन कुरेशी वय ४८ वर्षे, २) हमजा वाहिद कुरेशी वय २७ वर्षे दोघे रा. कुरेशी गल्ली शेवगाव ता. शेवगाव जि.अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन आरोपी नामे शाकिब बबु कुरेशी रा. दादेगाव रोड शेवगाव ता.शेवगाव व अन्वर मोहम्मद शेख रा. खाटीक गल्ली शेवगाव ता.शेवगाव हे फरार आहेत.
सदर गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालातुन केमीकल तपासणी करिता गोमांस राखुन ठेवुन इतर गोमांसची विल्हेवाट लावुन कत्तल खाना चालु असलेल्या ठिकाणचे बांधकाम जेसीबीचे सहाय्याने नगरपरिषद शेवगाव येथील अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फतीने पाडण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे अहिल्यानगर, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु उपविभाग शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक काटे,पोसई आजिनाथ कोठाळे,पोसई प्रविण महाले, पोसई रामहरी खेडकर, पोहेकाँ चंद्रकांत कुसारे, पोकाँ शाम गुंजाळ,पोकाँ भगवान सानप,पोकाँ राहुल आठरे, पोकाँ आदिनाथ शिरसाठ,पो काँ मारोती पाखरे, पोकाँ संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर,पोकाँ रोहीत पालवे, पोकाँ नवनाथ कोठे,पोकाँ एकनाथ गरकळ मपोहेकाँ गितांजली पाथरकर वरील गुन्ह्यांचा तपास पोसई आजिनाथ कोठाळे हे करत आहेत.
