लोणी आबा निर्मळ राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील डॉ. विकास बाळकृष्ण निर्मळ, हे केवळ विकास सहकारी सोसायटीचे अध्यक्ष नाहीत तर जय बजरंगबली दूध संकलन केंद्राचे चालक व संस्थापक देखील आहेत. समाज भावनेतून कार्य करणारे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणारे डॉ. विकास निर्मळ यांनी या दीपावळीला दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आगळंवेगळं भेट पॅकेज उत्पादकांच्या खाती वर्ग केल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
हा निर्णय दूध उत्पादकांसाठी आनंदाची बाब ठरली असूनया वर्षी डेअरी तर्फे प्रति लिटर १ रुपया आणि स्वतःच्या वतीने १ रुपया, अशा एकूण प्रति लिटर २ रुपयांची विशेष रिबीट देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
यामध्ये एकूण ३८ लाख इतकी रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आली असून रिबीट अनामत आणि एक पेमेंट असे मिळून ती संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने दीपावळीचा उजेड फुलला आहे.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हिच खरी दीपावली अशा भावना डॉ.निर्मळ यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पत्रकारांशी बोलताना डॉ.विकास बाळकृष्ण निर्मळ म्हणाले की स्वतःचा विचार नंतर, पण उत्पादकांचा विचार आधी हेच माझे आपल्या केंद्रांचे धोरण आहे.शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो,तेव्हाच मला खऱ्या अर्थाने दीपावली वाटते.
डॉ. विकास बाळकृष्ण निर्मळ हे शेतकरी हितासाठी समर्पित व्यक्तिमत्व असुन गोरगरिबांच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभे राहणारे,समाज कार्यातून प्रेरणा घेणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत झटणारे डॉ. विकास निर्मळ हे आज तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली जय बजरंग दूध संकलन केंद्राने नेहमीच “शेतकऱ्यांचा विकास,हाच आमचा उत्सव” हा ध्यास जपला आहे.
