गतिमान आणि पारदर्शी कारभार ठेवावा;पदाची सूत्रे संभाळताच अधिकाऱ्यांना सुचना

Cityline Media
0
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

नाशिक दिनकर गायकवाड जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार,निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. पवन दत्ता (इगतपुरी),उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (प्रशासन), उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी विक्रमकुमार, तहसीलदार पंकज पवार, वैशाली आव्हाड,उषाराणी देवगुणे, मंजुषा घाटगे, आबासाहेब तांबे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रशासनाची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की,कोणतेही काम प्रलंबित ठेवू नका.गतिमान आणि पारदर्शी कारभार ठेवावा. वेळेत सर्व कामे मार्गी लावावीत. ई- ऑफिसचा वापर करावा. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.

प्रसाद हे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१५ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी धाराशिव येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी, घोडेगाव (जि. पुणे) येथे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी,अकोला आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!