दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
खळी गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून बुद्ध वंदना धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी गावचे सरपंच विलास गजानन वाघमारे उपसरपंच तथा राजहंस दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर जनसेवा युवा नेते सुरेश नागरे ॲड.बाळासाहेब वाघमारे अनिल वाघमारे शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे
तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब नागरे चंद्रभान तांबे रेवजी सातपुते सोमनाथ नागरे साहेबराव तांबे सुनील नागरे सोन्याबापु लबडे शिवाजी वाघमारे बाळासाहेब भिकाजी वाघमारे लहानू वाघमारे शंकर वाघमारे लक्ष्मण बर्डे नवनाथ थोरात अनिल मुंडे बबन नागरे आदी मान्यवर धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यावेळी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करताना अन्याय विषमता अंधश्रद्धे विरुद्धचा जागृतीचा दिवस आज असून १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारून मानवतेला नवा मार्ग दिला नागपूरच्या दीक्षाभूमीवर उभा राहिलेला ऐतिहासिक क्षण असून आजही संस्थेचा बंधुत्वता आणि करुणेचा संजय देत आहे त्यामुळे वैभवीत मन हे निर्भय झाले आहे ताठ मानेने जो तो चाले नागपुरात भीमरायाने सोन वाटलं समाजाचा पारणं फिटल असे व्यक्त करत धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त तमाम नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
