दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ खुर्द येथे अतिवृष्टीच्या परतीच्या पावसाने शंभर मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने येथील शेतकऱ्याचे खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दाढ खुर्द गावचे ग्रामसेवक श्री.चांडे व तलाठी अनुपमा गांगुर्डे यांनी थेट शेतकऱ्यांच्या आग्रह मुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
कपाशी बाजरी सोयाबीन मका कांदे तुर यासारखे महत्त्वाच्या पिकामध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून पंचनामा करून शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान झालेल्या पिकाचे जास्तीत जास्त मदत मिळावी याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन तलाठी अनुपमा गांगुर्डे व ग्रामसेवक श्री.चांडे यांनी शेतकऱ्यांवरील दोन्ही अधिकाऱ्यांचे शेती पिकामध्ये प्रत्यक्ष येऊन पाहणी केल्याने समाधान व्यक्त केले.
दिवाळीच्या अगोदर शासनाने येथील शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करावी असे आवाहन येथील शेतकऱ्यांनी केले असून त्यांच्या समवेत दाढ खुर्द येथील विरोधी पक्ष नेते किशोर जोशी शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे रिपब्लिकन पक्षाचे शाखाप्रमुख राजेंद्र जमदाडे ग्रामपंचायत सदस्य राऊसाहेब शंकर जमधडे आदीप्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी यांनी शासनाला विनंती करताना येथील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांनी पीक कर्ज व सावकारी कर्ज घेऊन येथे पिके उभे केले होते परंतु निसर्गाने शेतकऱ्यावर घाला घातला असून आलेले पीक सर्व पाण्यामध्ये सोडून गेल्यामुळे येथील शेतकऱ्यांची
दिवाळी अंधारात जाणारा असल्याची अपेक्षा व्यक्त करत शासनाने येथील शेतकऱ्यांना भरीव मदत करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई वर्ग करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यासह सामाजिक कार्यकर्ते दगडू साळवे डॉ.राजेंद्र साळवे त्रिंबक जोरी सिताराम साळवे संपत बोराडे सोमनाथ जोशी दत्तात्रय पर्वत भैय्या शेख बाबू सुभान जोशी हरिभाऊ जोरी तुकाराम माळी अधिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
