नाशिक जिल्ह्यातील आरक्षण सोडतीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची निवड

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोग सचिवांचे ३ ऑक्टोबर २०२५ अन्वये नगरपरिषद, नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम निर्गमित केला आहे. प्रारूप आरक्षणाची सोडत काढण्याचा कालावधी दि. ८ ऑक्टोबरपर्यंत करणे आवश्यक असल्याने त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत व तत्सम कामासाठी अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. प्राधिकृत अधिकारी व मुख्याधिकारी संबंधित नगरपरिषदांनी उद्या (दि.८) सकाळी ११ वाजता संबंधित नगरपरिषदेच्या सभागृहात आदेशातील तरतुदींचे काटेकोर व तंतोतंत पालन करून मुदतीत नागरिकांसमक्ष आरक्षण सोडत काढण्याची कार्यवाही करावी,असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आदेशित केले आहे.

नगरपरिषद‌निहाय प्राधिकृत अधिकारी १. येवला नगरपरिषद उपविभागीय अधिकारी, येवला, २. मनमाड नगरपरिषद-उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), ल. पा. नाशिक, ३. सिन्नर नगरपरिषद-उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) पाटबंधारे क्रमांक १, नाशिक, ४. ओझर नगरपरिषद-उपविभागीय अधिकारी, दिंडोरी, ५. पिंपळगाव बसंवत नगरपरिषद उपविभागीय अधिकारी, निफाड, ६. इगतपुरी नगरपरिषद-उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्रमांक २, नाशिक, ७. त्र्यंबक नगरपरिषद - उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, ८. नांदगाव नगरपरिषद उपविभागीय अधिकारी, मालेगाव, ९. सटाणा नगरपरिषद - उपविभागीय अधिकारी, बागलाण, १०.भगूर नगरपरिषद-उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), वै.त.प्र.नाशिक, ११. चांदवड नगरपरिषद-उपविभागीय अधिकारी,चांदवड.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!