श्रीरामपूर दिपक कदम- दीपावलीच्या पार्श्वभूमीवर जसा देशभरात उत्साह आहे तसंच गोरगरीब रिन करुन सण साजरा करतो श्रीरामपूर शहरातील बाजारपेठ खरेदीसाठी सजली होती.सुरुवातीला खरेदी थोडीसी कासवगतीने सुरू होती तरी, शेवटच्या दोन दिवसांत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे व्यापाऱ्यांच्या समाधान व्यक्त केले आहे.
यंदाही दीपावली निमित्त कपडे, फटाके,फराळ साहित्य, सजावटीचे साहित्य,दागिने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी बाजारपेठ बहुजन समाजाने गजबजून गेली होती. मात्र,काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरेदीची गती काहीशी मंदावली होती.त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये थोडी चिंता दिसून येत होती.शेवटच्या दोन दिवसात झालेल्या जोरदार खरेदीमुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सुरुवातीला पावसामुळे गृहसजावट साहित्य आणि मिठाईसाठी विशेष पोशाख, उत्साह दाखवला. लहान मुलांनी फटाक्यांची खरेदी करत बाजारपेठेत आनंदाचे वातावरण निर्माण केले.खरेदी मंदावली होती, पण शेवटच्या क्षणी नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिल्याने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
दीपावली पूर्वीच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. जिल्ह्यात विविध ठिकाणी काही प्रमाणात पावसाचे सरी कोसळल्याने दीपावलीच्या खरेदीसाठी श्रीरामपूरच्या बाजारपेठेत गर्दी खरेदीसाठी झालेली गर्दी सुरुवातीच्या दिवसांमध्ये खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
हवामानातील अनिश्चिततेमुळे ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलली. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एकप्रकारची संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दसऱ्याच्या नंतर खरेदीला चांगली सुरुवात होते, पण यंदा अवकाळी पावसामुळे झालेल्या नागरिकांनी सुरुवातीच्या आठवड्यात खरेदीसाठी उत्साह दाखविला नव्हता.
मात्र, दीपावलीचा दिवस जसजसा जवळ येत गेला, तसतशी बाजारपेठेत ग्राहकांची उपस्थिती वाढू लागल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली. नवीन कपडे, गृहसजावटीच्या वस्तू, फराळासाठी लागणाऱ्या खाद्यसामग्रीची खरेदी, आकर्षक दिवे व पणत्या, तसेच लहान मुलांसाठी खेळणी व फटाक्यांचे मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. महिलावर्गाने साड्या, सौंदर्यप्रसाधने, दागिने, आणि स्वयंपाकघरातील वस्तू खरेदीस ग्राहकांनी गर्दी केली.
