सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र जाधव यांचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नाशिक दिनकर गायकवाड अवकाळी पावासामुळे द्राक्षे, कांदे,सोयाबीन,मका, तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एकरी दोन लाख भरपाई व विमा मिळण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी धर्मेंद्र जाधव यांनी नुकतेच नाशिक जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना नुकतेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी मागणी निवेदन सादर केले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे
सहा महिन्यापासून पावसामुळे पहिली पेरणी,दुबार पेरणी करुन सुध्दा,कष्ट करुन शेतकरी झिजला,आज ऊद्या हाताशी काहीतरी पैसा अडका मिळेल परंतु काहीही नाही.
पुन्हा अवकाळी पावसाने जोरदार धक्का देत द्राक्षे,कांदा,मका,सोयाबीन,टोमॅटो,भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी पिढीत शेतकऱ्यांना दोन लाख रुपये एकरी भरपाई मिळावी तसेच विमा आणि कर्जमाफी देखील मिळावी.
शेतकरी जगाला तर महाराष्ट्र जगेल त्याला वाचविण्यासाठी विनाविलंब त्वरित नुकसान भरपाई मिळावी अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्या कार्यालय जवळ जाहिर उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
