खासदार भास्कर भगरे यांची शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक जिल्ह्यातील सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी,अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नाशिक जिल्ह्यात मे महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष, भात,सोयाबीन, भुईमूग ,मका,कांदा, टोमॅटो, डाळिंब या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक
घडी विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांर्त १ शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.
काही ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली असून शेतकऱ्यांकडे पुन्हा पीक घेण्याचे साधन नाही. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, मोठा खर्च करून घेतलेली शेती पावसाने उध्वस्त झाल्याने आत्मनिर्भर शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला आहे.
