संगमनेर प्रतिनिधी भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या बेंच जवळ एका माथेफिरू वकिलाने बूट फिरकावत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्या गोष्टीचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने निषेध करीत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.
संगमनेर प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,देशाच्या सर्वोच्च न्यायालयात,जिथे न्याय,समता आणि संविधान हे सर्वोच्च आहेत तिथेच नुकतीच एक अत्यंत लज्जास्पद घटना घडली. भारताचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्या बेंच जवळ रमेश किशोर नावाच्या एका माथेफिरू वकिलाने बूट फिरकावत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
जर देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश सुद्धा अशा अपमानजनक वर्तनाचा बळी ठरत असतील,तर सामान्य जनतेच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? जात अजून संपलेली नाही. हे या घटनेवरून आपल्याला समजते.
यावेळी जिल्हाध्यक्ष बंटी यादव,जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड,जिल्हा सरचिटणीस शशिकांत थोरात, शहराध्यक्ष सोनू गायकवाड,जिल्हा सरचिटणीस रामनाथ गायकवाड, जिल्हा सोशल मीडिया समन्वयक उदय अभंग,भीमराज सोनवणे,जालिंदर वाकचौरे,कैलास पवार,आदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या घटनेचा तीव्र निषेध करून निवेदन सादर केले.
