अहिल्यानगर प्रतिनिधी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की,बोल्हेगाव फाटा येथे एक इसम हातात लोखंडी धारधार कोयता घेवुन दहशत करुन फिरत आहे.खबर मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तपास पथकातील अमंलदार यांना सदर इसमावर कारवाई करण्यास सांगीतले त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाणे पथकाने बोल्हेगाव फाटा येथे जावुन खात्री केली असता तेथे एक इसम हातात लोखंडी कोयता घेवुन फिरतांना व दहशत करतांना मिळुन आला.
सदर इसमाजवळ जावु लागले असता तो पळुन जावु लागला. त्याचा पाठलाग करुन त्याला जागीच पकडुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रवि ज्ञानेश्वर साळुंके वय-२९ वर्ष रा शिंदे कॉलनी बोल्हेगाव फाटा ता.जि. अहिल्यानगर असे सांगितले.
त्याला त्यांचे अंगझडतीचा उद्देश समजावुन सांगुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक धारधार लोखंडी कोयता मिळुन आला म्हणुन त्याचे त्याचेविरुदध एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ७५२/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, नगर ग्रामिण उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने उपविभागीय यांचे मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक बी. चौधरी प्रभारी अधिकारी, एमआयडीसी पोलीस ठाणे, सफौ राकेश खेडकर, पोहेकॉ संदीप पवार, पोहेकॉ राजु सुद्रीक, पोहेकॉ देविदास खेडकर, पोकों/किशोर जाधव, पोकों नवनाथ दहिफळे, पोकों/ज्ञानेश्वर आघाव, पोकॉ शेरकर यांचे पथकाने केली आहे.
