मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नुकतेच येथील शासकीय निवासस्थानी जगप्रसिद्ध दहशतवादविरोधी प्रशिक्षण मार्गदर्शक,सैनिकी तज्ञ तसेच ‘कमांडोज माती सिस्टीम’ या पूर्णपणे भारतीय युद्धकला प्रणालीचे जनक ग्रँडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांची सदिच्छा भेट घेतली.
याआधी देखील शिफुजी यांच्याशी फलदायी चर्चा झाली होती. झालेल्या या पुनश्च र्भेटी दरम्यान शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सैनिकी शिक्षण, स्वसंरक्षण,योगशिक्षण,तसेच क्रीडा आणि कला शिक्षणाचा समावेश अधिक प्रभावीपणे कसा करता येईल,यावर प्राथमिक स्वरूपात चर्चा करण्यात आली.
येणाऱ्या काळात राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आत्मरक्षण,शिस्त,देशभक्ती, आणि मानसिक तसेच शारीरिक सबलीकरण या दृष्टीने विशेष प्रशिक्षण देण्यासाठी शासन पातळीवर व्यापक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
ग्रँडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज हे एक राष्ट्रभक्तीपर प्रेरक वक्ते असून तरुणाईला शिस्तबद्ध जीवनशैली, व्यसनमुक्ती आणि देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणक्षेत्रात नव्या उंची गाठण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
