रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आंदोलनाचा इशारा
श्रीरामपूर दिपक कदम अहिल्यानगर जिल्ह्यातील गावांमध्ये आजही अस्तित्वात असलेल्या जातीवाचक रस्ते,वस्ती व गल्लींची नावे तातडीने बदलण्यात यावीत,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाई) वतीने जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या हस्ते सादर करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना आंदोलनाचा इशारा दिला.
दि. २८ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील जातीवाचक नावे असलेले रस्ते,वस्त्या आणि गल्ल्या यांची नावे बदलण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, सांगली जिल्ह्याव्यतिरिक्त इतर अनेक जिल्ह्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना सुभाष त्रिभूवन.अशी खंत रिपाइंच्या निवेदनात व्यक्त करण्यात आली.त्रिभुवन म्हणाले, "आजही अनेक ठिकाणी जातीवाचक नावे वापरली जात आहेत.ही नावे जातीचा स्पष्ट संदर्भदेतात आणि दलित-वंचित घटकांच्या आत्मसन्मानास धक्का पोहोचवतात. त्यामुळे ही नावे त्वरित बदलून त्या जागी महापुरुषांची किंवा लोकशाही मूल्ये दर्शवणारी नावे द्यावीत.
निवेदनात पुढे ते म्हणाले, जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदार आणि ग्रामपंचायतींना यासंबंधी आदेश द्यावेत.अन्यथा, जिल्हाधिकारी रिपाईच्या वतीने कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल."
या मागणीमुळे जिल्हा प्रशासनासमोर सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषय पुन्हा एकदा उभा राहिला आहे.आता जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत कोणती पुढील कार्यवाही केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
