नाशिक दिनकर गायकवाड महिलेसोबत जवळीक साधून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून ते फोटो पतीला पाठविण्याची धमकी देऊन महिलेची अडीच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी संदीप सुधाकर केदारे (रा. पार्कसाईड होम्स, बळी मंदिर, पंचवटी) याने फिर्यादी महिलेची इच्छा नसताना तिच्यासोबत जवळीक साधली. त्यानंतर फिर्यादी महिलेचे चोरून फोटो काढून ते तिच्या पतीला पाठविण्याची धमकी दिली, तसेच पीडितेसोबत वेळोवेळी बळजबरीने शरीरसंबंध ठेवले व महिलेला फसविण्याच्या इराद्याने तिच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच तोळ्यांच्या सोन्याच्या
बांगड्या व दोन हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पीडितेची फसवणूक केली. हा प्रकार दि. १७जून २०१७ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जेलरोड येथील नारायण बापूनगरमध्ये या प्रकरणी संदीप केदारेविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
