सोनार दुकानांमध्ये हातचलाखीने ‌ दागिने चोरी करणारी महिलांची टोळी मुद्देमालासह जेरबंद

Cityline Media
0
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

कर्जत प्नतिनिधी दिपावली सणाचे वेळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे दागिने चोरीचे घटनांमध्ये तसेच सराफ व्यवसायिकांचे दुकानामध्ये चोरीच्या घटना घडलेल्या असल्याने जिल्ह्यातील कर्जत येथील साई ज्वेलर्स येथील फिर्यादी श्री हरिओम बापु मैड वय २० वर्षे, रा.गदादेनगर हे त्यांचे साई ज्वेलर्स दुकानामध्ये असतांना दोन अनोळखी महिलांनी दागिने खरेदी करण्याचे उद्देशाने येवुन दागिने पाहत असतांना हात चलाखीने फिर्यादीचे दुकानातील ३८,०९५ रुपये किमतीचे विविध वर्णनाचे चांदीचे दागिने चोरुन नेले आहेत.सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. ५७९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२४ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे दागिने चोरीचे घटनांमध्ये तसेच सराफ व्यवसायिकांचे दुकानामध्ये चोरीच्या घटना घडलेल्या असल्याने पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार ऱ्हदय घोडके, भिमराज खर्से,शामसुंदर जाधव, योगेश कर्डीले,महादेव भांड महिला पोलीस अंमलदार चिमा काळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हे उघडकीस आणणेकरीता सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.

हे पथक जामखेड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणारे तसेच सराफ व्यवसायिकांचे दुकानामध्ये दागिण्यांची चोरी करणारे महिला आरोपींची माहिती घेत असतांना पथकास बीड जिल्ह्यामधुन काही महिला जामखेड परिसरामध्ये येवुन सराफ व्यवसायिकांचे लक्ष विचलित करुन दागिने चोरी करत असुन त्यातील दोन महिला या पुन्हा चोरी करण्यासाठी जामखेड बस स्थानक परिसरामध्ये आलेल्या असल्याची माहिती मिळाली.

पथकाने तात्काळ जामखेड बस स्थानक परिसरात जावुन खात्री करता दोन संशयित महिला दिसुन आल्या.या महिलांना महिला पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नावे गांव विचारता त्यांनी त्यांची नावे. १) शांताबाई राधाकिसन जाधव (वय ५५ वर्षे) रा. हिवरसिंगा, ता. शिरुर, बीड, २) निलावती लक्ष्मण केंगार वय ५२ वर्षे, रा. मुर्शदपुर, ता. जि. बीड असे असल्याचे सांगितले. या महिलांचे ताब्यातुन ४९,८७५ रुपये किमतीचे विविध वर्णनाचे चांदीचे दागिने हस्तगत करुन वरील गुन्हा उघडकीस आणला आहे.

ताब्यातील महिला आरोपींना कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. ५७९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी कर्जत पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कर्जत पोलीस ठाणे करीत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!