अहिल्यानगर प्नतिनिधी नियमितच्या अन्याय अत्याचाराने त्रस्त झालेल्या समाजाच्या मते अहिल्यानगर पुर्वीचा अहमदनगर जिल्हा बांडगुळांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कारण कौलाघात जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांत जात्यांध मानसिकता खचाखच भरलेली आहे यापूर्वीच्या बौद्ध,मातंग बहुजन समाजावरील अन्याय अत्याचाराने जिल्ह्याचे नाव देशाच्या नकाशावर स्पष्टपणे झळकले आहेत आताही समाजावर निरंतर अन्याय,अत्याचार होत आहे.नुकतेच नेवासा तालुक्यातील सोनई येथे मातंग समाजाची हिंदुत्वाची वज्रमूठ उघडली आणि येथील संजय नितीन वैरागर नावाच्या युवकास तेथील जात्यांध मानसिकता असलेल्या गावगुंडांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
हा अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे.त्या कारणाने आमच्या मातंग समाजाच्या खुप कुटुंबावर खेड्यापाड्यानी खुप अन्याय,अत्याचार होतो.आता तर आमच्या जातीवर देखील शिव्या देणं सुरू झाले आहे आम्हाला विनाकारण लक्ष केले जातेय जे गावगुंड हि अन्याय अत्याचाराची मालिका सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला उत्तर देण्यासाठी १० नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर येथे लालटाकी येथील वीर लहुजी चौकात भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चात समाजबांधवांनी मोठ्या संख्खेने सहभागी व्हावे असे आवाहन समाजाचे नेते विजय पठारे यांनी केले आहे.
सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी समाबांधवार अन्याय होत आहे.हा अन्याय दुर करून अन्याय करणाऱ्याला त्याची जागा दाखवणे आवश्यक आहे. अहिल्यानगर येथे होत असलेल्या मोर्चात मातंग बांधवानी,ज्याच्या मनात मातंग समजाविषयी तळमळ आहे.जातीचे काही देणे लागत असेल तर त्या सर्वानी उपस्थित राहावे.हा काही कोणाच्या घरचा मोर्चा नाही.
ज्या गावगुंडांनी मातंग जातीला,समाजाला शिवीगाळ केली त्याला उत्तर देण्यासाठी मातंग समाजा बरोबरच इतर समाजावर देखील अन्याय होत असेल तर त्यानी देखील मोर्चात लक्षणीय संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन मातंग समाजाचे नेते विजय पठारे यांनी केले आहे.
आझाद समाज पार्टीचे संगमनेर तालुका अध्यक्ष अमोल शेळके यांनी देखील बौद्ध आदीवासी बांधवांना एकत्र येऊन मोठ्या लोकसंख्येने अहिल्यानगर येथे उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली आहे
