झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर झरेकाठी येथील
प्रवरा माध्यमिक विद्यालयातील सन २००६-०७ च्या बॅचच्या विदयार्थी व विदयार्थीनींनी माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात सहभागी होवून सुखद आनंद घेतला.
प्रमुख मार्गदर्शक शिक्षक मा.प्राचार्य डॉ.अनिल लोखंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन करताना आपण सध्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहात तेथे प्रमाणिकपणे व सातत्याने चांगले काम करून आपले ,शाळेचे ,शिक्षकांचे ,आईवडिलांचे नाव मोठे करावे. त्यांनी तुमच्यावर रुजवलेले संस्कार जतन करून कार्य करीत राहिल्यास नक्की एक दिवस आपण देखील परमोच्च पदावर जाऊन आनंद घेऊ शकाल असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. ए.सिनारे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या .तसेच कलाशिक्षक संतोष पुलाटे यांनी सांगितले की आम्ही तुमच्यावर संस्कार करताना जे शिक्षण देत असतो ते काळजीपूर्वक ग्रहण केल्यास त्याचे नक्की कल्याण होत असते हे नंतर कळते.
मा.मुख्याध्यापक श्री पाटील,पत्रकार सोमनाथ डोळे यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव कोचिंग क्लासचे संचालक प्रा. सतीश वाणी यांनी केले ,तर छाया वाणी,सचिन वाणी ,रमेश अनाप ,सुरज अनाप ,प्रियांका अंधाळे ,मनीषा चोपडे ,माधुरी सिनारे ,सारिका वाणी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले व परस्परांशी ओळख करून देत शालेय जीवनातील आपले बरे वाईट अनुभव कथन केले.
शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या शिक्षा व ज्ञानामुळेच आम्ही यशस्वी होऊ शकलो ,त्यामुळे शाळेप्रती व शिक्षकांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करीत हितगुज साधले. त्यानंतर सर्वांनी गीत गाऊन व करमणूक करून शेवटी मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घेत पुढील वर्षांमध्ये पुनःश्च भेटण्याचे कबूल केले. शेवटी छाया वाणी हिने आभार मानले आणि सर्वांनी आनंदाने एक सकारात्मक ऊर्जा घेऊन निरोप घेतला.
