नाशिक दिनकर गायकवाड शहरातील एका मुलीसह मुलाला अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत त्यांचे अपहरण केल्याच्या नोंदी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.
अपहरणाचा पहिला प्रकार पंचवटीत घडला.फिर्यादी हे पंचवटीतील माने गार्डन परिसरात राहतात. त्यांची मुलगी घरी एकटी होती.त्यावेळी अज्ञात इसमाने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
अपहरणाचा दुसरा प्रकार अंबड परिसरात घडला.फिर्यादी हे सिडकोत पाटील पार्क परिसरात राहतात. त्यांचा मुलगा हा दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरी होता. या मुलाला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेत त्याचे अपहरण केले. बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही.त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तो मिळून आला नाही. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
