नाशिक दिनकर गायकवाड मोठमोठ्याने ओरडून ३ लाख रुपये दे असे बोलून शिवीगाळ करत एका इसमाला बळजबरीने गाडीत बसवून त्याचे अपहरण केल्याची घटना नांदूर नाका येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सविता जगन चव्हाण (रा. गणपतनगर, नांदुर नाका) या मजुरी काम करतात. काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही महिला तिच्या घरी होती.
त्यावेळी त्यांच्या घराजवळ तीन अनोळखी इसम आले.त्यांनी फिर्यादीच्या नवऱ्याकडे येऊन आमचे तीन लाख रुपये दे, असे बोलून त्याला शिवीगाळ दमदाटी करुन त्याला बळजबरीने सफेद रंगाच्या गाडीत बसवून घेऊन जात अपहरण केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात ३ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे करीत आहे.
