नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील बाऱ्हे परिसरात नागरिक मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाने त्रस्त झाले आहेत.रात्रभर भुंकणे आणि दिवसा बाहन धारकांच्या मागे धावणे, पादचाऱ्यांवर गुरगुरणे या त्यांच्या दिनक्रमामुळे नागरिक हतबल झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांमधून होत आहे.
बाऱ्हे परिसरात मोकाट कुत्री हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यानच्या काळात नागरिकांवर हल्ले करण्यापर्यंत मोकाट कुत्र्यांची मजल गेली आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी, रस्त्यावरून जाणारे नागरिक, दुचाकीस्वार, व्यापारी वर्ग यांना कुत्र्यांकडून लक्ष केले जात आहे. बऱ्याचदा कुत्रे समोर येत घाबरून वाहनधारक घसरून अपघात होतात. विशेष म्हणजेही सर्व कुत्री एकत्र समूहाने राहतात. या समूहांनी स्वतःच्या हद्दी बनविलेल्या आहेत. एकमेकांच्या हद्दीत आलेल्या एका माणसांवर हे समूहाने हल्ला
सुरू करतात. रात्रभर एकमेकांवर कुत्री भुंकत असल्याने नागरिकांची झोप उडविण्याचे काम करतात. दिवसा पाट्वाऱ्यांना त्रस्त करतात. सुमारे १० ते १५ कुत्री पोलीस ठाणे, ठाणगाव रस्ता, सुरगाणा रस्ता, खडकपाडा ते बिरसा मुंडा चौक ते बाजारपेठेपासून ते बाहे गावापर्यंत बावरत असल्याचे चित्र आहे. वाहनधारक, नागरिक किंवा अन्य कुत्रे दिसले की, ते अचानक हल्ला बढवितात. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कळपाने फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे घराबाहेर पडणे ही धोक्याचे झाले असल्याने प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यास संकट अटळ
बान्हे परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला ही वस्तुस्थिती आहे. मोकाट कुत्र्यांबाबत लवकरच प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.
रामदास देशमुख, ग्रामस्थ बान्हे,
