आश्वी बुद्रुकमध्ये हिंसक बिबट्याची दहशत
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर परिसरात शुक्रवारी रात्री सुमारास दोन वाजता भक्ष्याच्या शोधत असलेल्या बिबट्याने मानवी वस्तीत घुसून दोन गर्भार शेळ्यांना ठार मारून फस्त केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
बांधकाम कामगार बाळासाहेब निवृत्ती कदम यांच्या घराशेजारी बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने अचानक हल्ला केला.यात अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले.सुदैवाने थंडीमुळे कोणी बाहेर झोपले नसल्याने मोठा अनर्थ टळला.
गेल्या काही दिवसांपासून शेतवस्त्यांवर बिबट्याचा वावर वाढला असून ग्रामस्थांमध्ये या हिंस्र श्वापदाची दहशत निर्माण झाली आहे.या परिसरातील बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत व बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी येथील रामदास साळवे,बाळासाहेब कदम, संतोष साळवे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
