नाशिक दिनकर गायकवाड मुला-मुलींचे लग्न जुळविण्यासाठी आप्तेष्टांची जागा वधू-वर सूचक मंडळांनी घेतली आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
लग्न जमविण्यासाठी पूर्वी आप्तेष्ट व गोतावळ्यांच्या माध्यमातून सोयरिकीची चर्चा व्हायची,मात्र आता विभक्त कुटूंबामुळे गावगाड्याची संकल्पना मागे पडली.यामुळे मुला-मुलींचे लग्न जमविण्यासाठी वधू-वर मंडळे आधार ठरत आहे. आपल्या जोडीदारांबाबत अपेक्षा वाढल्या असून विभक्त कुटूंब पध्दती अधिक स्वीकारली जात आहे. यामुळे अपेक्षित जोडीदार शोधताना पालकांची दमछाक होतांना दिसून येते. या मंडळाद्वारे पालकांना आपल्या पाल्यांसाठी अपेक्षित स्थळांचा शोध घेणेसोपे झाले आहे.शहरी व ग्रामीण भागातील नातेसंबंधामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे.दरी कमी करण्यासाठी मंडळांनी कार्य करणे आवश्यक आहे.
