पुरावा सापडू नये म्हणुन सीसीटीव्हीसह सुपर ग्राहक बाजारात अडीच लाखांची धाडसी चोरी

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड नवीन नाशिक परिसरातील बापू बंगल्याजवळ असलेल्या सुपर ग्राहक बाजार या किराणा दुकानात मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा भंडारे यांना सकाळी या दुकानाचे शटर उघडे असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ आजूबाजूच्या नागरिकांना माहिती देत घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान,दुकानाचे कर्मचारी उत्तम दुशिंग हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांनाही शटर वाकलेले व तुटलेले दिसून आले. त्यांनी तत्काळ दुकान मालक राहुल शिंदे यांना फोन करून

माहिती दिली. मालकाने तत्काळ इंदिरानगर पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता,चोरट्यांनी कौशल्याने चोरी करत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरच पळवून नेल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांना घटना स्थळाचे फुटेज मिळू शकलेले नाही. दुकानाच्या काउंटरमधील अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दुकान मालक राहुल शिंदे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

परिसरातील इतर दुकानदारांमध्येही या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!